पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| परमेशाचे स्तवन करा!1 परमेश्वराचे सेवकहो, तुम्ही त्याचे स्तवन करा; परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. |
| 2 |
| येथून पुढे सर्वकाळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद होवो. |
| 3 |
| सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. |
| 4 |
| परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे; त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे; |
| 5 |
| परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे, |
| 6 |
| जो आकाश व पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लवतो, त्याच्यासारखा कोण आहे? |
| 7 |
| तो कंगालास धुळीतून उठवतो, दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो; |
| 8 |
| आणि त्यांना अधिपतींच्या, आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवतो. |
| 9 |
| तो वांझ स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. परमेशाचे स्तवन करा!1 |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/113.mp3
150
113