मराठी बायबल 2006
|
| 1 |
| इस्राएलने मिसर देश सोडला. याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला. |
| 2 |
| यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इस्राएल त्याचे राज्य झाले. |
| 3 |
| लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला. यार्देन नदी वळली आणि पळाली. |
| 4 |
| पर्वत मेंढ्यांसारखा नाचला. टेकड्या कोकरासारख्या नाचल्या. |
| 5 |
| लाल समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस? |
| 6 |
| पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात? आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात? |
| 7 |
| पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या देवासमोर थर थर कापली. |
| 8 |
| देवानेच खडकातून पाणी वहायला लावले. देवानेच कठीण खडकातून झरे वाहायला लावले. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/114.mp3
150
114