पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| इस्राएल मिसर देशातून निघाला, याकोबाचे घराणे परकी भाषा बोलणार्या लोकांतून निघाले, |
| 2 |
| तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाला. |
| 3 |
| हे पाहून समुद्र पळाला; यार्देन मागे हटली. |
| 4 |
| पर्वतांनी मेंढ्यांसारख्या आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या उड्या मारल्या. |
| 5 |
| हे समुद्रा, तुला काय झाले म्हणून तू पळतोस? हे यार्देने, तुला काय झाले म्हणून तू मागे हटतेस? |
| 6 |
| अहो पर्वतांनो, तुम्हांला काय झाले म्हणून तुम्ही मेंढ्यांसारख्या उड्या मारता? अहो टेकड्यांनो, तुम्हांला काय झाले म्हणून तुम्ही कोकरांसारख्या उड्या मारता? |
| 7 |
| हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर, थरथर काप. |
| 8 |
| तो खडक पालटून पाण्याचे तळे करतो, गारेचा खडक पालटून पाण्याचा झरा करतो. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/114.mp3
150
114