पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| आमचे नको, हे याहवेह, आमचे नको, तुमची प्रेमदया आणि तुमच्या विश्वसनीयते निमित्त, तुमचेच नाव गौरवित होवो. |
| 2 |
| इतर राष्ट्र असे का म्हणतात, “यांचा परमेश्वर कुठे आहे?” |
| 3 |
| आमचे परमेश्वर तर स्वर्गात आहेत; त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात. |
| 4 |
| पण त्या तर मानवी हातांनी बनविलेल्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती आहेत. |
| 5 |
| त्यांना तोंडे आहेत, पण बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत, पण ते बघू शकत नाहीत. |
| 6 |
| त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही, नाक असून वासही येत नाही. |
| 7 |
| त्यांना हात असून स्पर्श करता येत नाही, पाय आहेत पण चालता येत नाही; त्यांच्या कंठातून कुठलाही ध्वनी बाहेर पडत नाही. |
| 8 |
| मूर्ती घडविणारे त्यांच्यासारखेच होतील, आणि त्यांच्यावर भरवसा ठेवणारेही तसेच होतील. |
| 9 |
| हे समस्त इस्राएला, याहवेहवर भरवसा ठेव— तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत. |
| 10 |
| अहो अहरोनाच्या वंशजांनो, याहवेहवर भरवसा ठेवा— तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत. |
| 11 |
| अहो देवाचे भय मानणारे लोकहो, याहवेहवर भरवसा ठेवा— तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत. |
| 12 |
| याहवेह आमची आठवण ठेवतात, ते आम्हाला आशीर्वाद देतील: ते इस्राएली लोकांना आशीर्वाद देतील, ते अहरोनाच्या वंशजांना आशीर्वाद देतील, |
| 13 |
| आणि जे याहवेहचे भय बाळगतात त्यांना आशीर्वाद देतील— सर्व लहानथोरांना एकसमान. |
| 14 |
| याहवेह तुम्हाला समृद्ध करो, तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांनाही. |
| 15 |
| याहवेह, ज्यांनी आकाश व पृथ्वी निर्माण केली तेच, तुम्हाला आशीर्वादित करोत. |
| 16 |
| सर्वोच्च स्वर्ग याहवेहचा आहे, परंतु त्यांनी पृथ्वी मानवजातीला दिलेली आहे. |
| 17 |
| मृतक व चिरनिद्रा घेणारे, याहवेहची स्तुतिस्तोत्रे गात नसतात. |
| 18 |
| परंतु आम्हीच याहवेहची स्तोत्रे गातो, आता आणि सदासर्वकाळ. याहवेहचे स्तवन करा. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/115.mp3
150
115