मराठी बायबल 2006
|
| 1 |
| परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो ते मला खूप आवडते. |
| 2 |
| मी त्याला मदतीसाठी हाक मारतो आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते. |
| 3 |
| मी जवळ जवळ मेलो होतो. मृत्यूचे दोर माझ्या भोवती आवळले गेले होते. माझ्या भोवती थडगे आवळले जात होते. मी खूप घाबरलो होतो आणि चिंतित झालो होतो. |
| 4 |
| नंतर मी परमेश्वराचे नाव घेतले. मी म्हणालो, “परमेश्वरा, मला वाचव.” |
| 5 |
| परमेश्वर खूप चांगला आणि कृपाळू आहे. देव दयाळू आहे. |
| 6 |
| परमेश्वर असहाय्य लोकांची काळजी घेतो. मला कोणाची मदत नव्हती आणि परमेश्वराने माझा उध्दार केला. |
| 7 |
| माझ्या आत्म्या शांत हो! परमेश्वर तुझी काळजी घेतो आहे. |
| 8 |
| देवा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूपासून वाचवलेस तू माझे अश्रू थोपविलेस. तू मला पतनापासून वाचविलेस. |
| 9 |
| मी सजीवांच्या भूमीत परमेश्वराची सेवा करणे चालूच ठेवीन. |
| 10 |
| “माझा सत्यानाश झाला” असे मी म्हणालो तरी मी विश्वास ठेवणे चालूच ठेवले. |
| 11 |
| मी घाबरलो होतो तेव्हा सुध्दा मी म्हणालो होतो, सगळे लोक खोटारडे आहेत. |
| 12 |
| मी परमेश्वराला काय देऊ शकतो? माझ्या जवळ जे आहे ते मला परमेश्वरानेच दिले आहे. |
| 13 |
| त्याने मला वाचवले म्हणून मी त्याला पेय अर्पण करीन आणि मी परमेश्वराला त्याच्या नावाने हाक मारीन. |
| 14 |
| मी परमेश्वराला कबूल केलेल्या गोष्टी देईन. आता मी त्याच्या लोकांसमोर जाईन. |
| 15 |
| परमेश्वराच्या एखाद्या भक्ताचा मृत्यू परमेश्वराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतो. परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे. |
| 16 |
| मी तुझा सेवक आहे. मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे. परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस. |
| 17 |
| मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन. मी परमेश्वराचे नामस्मरण करीन. |
| 18 |
| मी कबूल केलेल्या गोष्टी परमेश्वराला देईन. आता मी त्याच्या सर्व लोकांसमोर जाईन. |
| 19 |
| मी यरुशलेम मध्या मंदिरात जाईन. परमेश्वराचा जयजयकार करा. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/116.mp3
150
116