पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो. |
| 2 |
| त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन. |
| 3 |
| मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले, |
| 4 |
| तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो, “हे परमेश्वरा, तुला मी विनवतो की माझा जीव मुक्त कर.” |
| 5 |
| परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे. |
| 6 |
| परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला. |
| 7 |
| हे माझ्या जिवा, तू आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. |
| 8 |
| तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूंपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून वाचवले आहेत. |
| 9 |
| जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. |
| 10 |
| “मी फार पीडित आहे,” असे मी म्हणतो; तरी देवावर माझी श्रद्धा आहे. |
| 11 |
| मी अधीरपणे म्हणालो की, “सर्व माणसे लबाड आहेत.” |
| 12 |
| परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ? |
| 13 |
| मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. |
| 14 |
| परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. |
| 15 |
| परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. |
| 16 |
| हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे; मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे; तू माझी बंधने सोडली आहेत. |
| 17 |
| मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन, परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. |
| 18 |
| परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. |
| 19 |
| परमेश्वराच्या घराच्या अंगणात, हे यरुशलेमा, तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेशाचे स्तवन करा!1 |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/116.mp3
150
116