पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| मी याहवेहवर प्रीती करतो, कारण त्यांनी माझी वाणी ऐकली; माझी दयेची विनवणी ऐकली. |
| 2 |
| कारण त्यांनी आपला कान माझ्या हाकेकडे लावला, म्हणून आजीवन मी त्यांचा धावा करीत राहीन. |
| 3 |
| मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले होते; कबरेच्या भयाने मला ग्रासले, दुःख व क्लेशांनी माझ्यावर मात केली होती. |
| 4 |
| तेव्हा मी याहवेहचा धावा करून म्हणालो: “हे याहवेह, मला वाचवा!” |
| 5 |
| याहवेह कृपाळू आणि नीतिमान आहेत; आपले परमेश्वर करुणामय आहेत. |
| 6 |
| याहवेह साध्याभोळ्या लोकांचे रक्षण करतात; मी गर्तेत ओढला गेलो असताना, त्यांनी मला वाचविले. |
| 7 |
| हे माझ्या जिवा, पुन्हा एकदा शांतचित्त हो, कारण याहवेहने तुझे भले केले आहे. |
| 8 |
| कारण हे याहवेह, तुम्ही मला मृत्यूपासून सोडविले, माझे डोळे अश्रूंपासून आणि माझे पाय अडखळण्यापासून रक्षिले आहेत. |
| 9 |
| जेणेकरून मी जिवंत लोकांमध्ये राहून, याहवेहच्या समक्षतेत चालू शकेन. |
| 10 |
| जेव्हा मी याहवेहवर विश्वास ठेवला तेव्हा मी बोललो, “मी फार पीडित आहे;” |
| 11 |
| घोर निराशेच्या भरात मी म्हणालो, “प्रत्येक मनुष्य लबाड आहे.” |
| 12 |
| परंतु याहवेहचे माझ्यावरील सर्व उपकार, मी कसे फेडणार? |
| 13 |
| मी तारणाचा प्याला उंच करून, याहवेहच्या नावाचा धावा करेन. |
| 14 |
| मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन. |
| 15 |
| याहवेहच्या दृष्टीने, त्यांच्या निष्ठावानांचा मृत्यू अतिशय मोलवान आहे. |
| 16 |
| हे याहवेह, मी निश्चितच तुमचा सेवक आहे; माझ्या मातेसमान मी देखील तुमची सेवा करेन; मला तुम्ही बंधन मुक्त केले आहे. |
| 17 |
| मी तुम्हाला उपकारस्तुतीचे अर्पण करेन, आणि याहवेहच्या नामाचा धावा करेन. |
| 18 |
| मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन. |
| 19 |
| यरुशलेमात, तुमच्यासमक्ष याहवेहच्या या मंदिराच्या अंगणात ते पूर्ण करेन. याहवेहचे स्तवन करा. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/116.mp3
150
116