|
| 1 |
|
| परमेश्वराचे उपकारस्मरण करा कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सनातन आहे. |
|
| 2 |
|
| आता इस्राएलाने म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.” |
|
| 3 |
|
| अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.” |
|
| 4 |
|
| परमेश्वराचे भय धरणार्यांनी म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.” |
|
| 5 |
|
| अडचणीत असताना मी परमेशाचा धावा केला; तो ऐकून परमेशाने मला प्रशस्त स्थळी नेले. |
|
| 6 |
|
| परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? |
|
| 7 |
|
| माझा साहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; माझा द्वेष करणार्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन. |
|
| 8 |
|
| मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. |
|
| 9 |
|
| अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. |
|
| 10 |
|
| सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. |
|
| 11 |
|
| त्यांनी मला घेरले आहे; खरोखर मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. |
|
| 12 |
|
| त्यांनी मला मधमाश्यांप्रमाणे घेरले आहे; काट्याकुट्यांच्या आगीप्रमाणे ते विझून जातील, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. |
|
| 13 |
|
| मी पडावे म्हणून तू मला जोराने धक्का दिलास, पण परमेश्वराने मला सावरले. |
|
| 14 |
|
| परमेश माझे बल व माझे गीत आहे; तो माझे तारण झाला आहे. |
|
| 15 |
|
| उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे; “परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. |
|
| 16 |
|
| परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे; परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो.” |
|
| 17 |
|
| मी मरणार नाही, तर जगेन, आणि परमेशाच्या कृत्यांचे वर्णन करीन. |
|
| 18 |
|
| परमेशाने मला जबर शासन केले; तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही. |
|
| 19 |
|
| माझ्यासाठी नीतिमत्त्वाची द्वारे उघडा म्हणजे मी त्यांतून प्रवेश करून परमेशाचे उपकारस्मरण करीन. |
|
| 20 |
|
| हे परमेश्वराचे द्वार आहे; ह्यातून नीतिमान प्रवेश करोत |
|
| 21 |
|
| तू माझे ऐकले आहे, तू माझे तारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो. |
|
| 22 |
|
| बांधणार्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. |
|
| 23 |
|
| ही परमेश्वराची करणी आहे; ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. |
|
| 24 |
|
| परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे. ह्यात आपण उल्लास व आनंद करू. |
|
| 25 |
|
| हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचा उत्कर्ष कर. |
|
| 26 |
|
| परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो. |
|
| 27 |
|
| परमेश्वर देव आहे, त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे. उत्सवाचा यज्ञपशू वेदीच्या शिंगांना दोर्यांनी बांधा. |
|
| 28 |
|
| तू माझा देव आहेस; मी तुझे उपकारस्मरण करीन; हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. |
|
| 29 |
|
| परमेश्वराचे उपकारस्मरण करा; कारण तो चांगला आहे. कारण त्याची दया सनातन आहे. |
|
|
|
|