|
| 1 |
|
| जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य! |
|
| 2 |
|
| जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य! |
|
| 3 |
|
| ते काही अनीतीचे आचरण करत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात. |
|
| 4 |
|
| तुझे विधी आम्ही मनःपूर्वक पाळावेत म्हणून तू ते आम्हांला लावून दिले आहेत. |
|
| 5 |
|
| तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे. |
|
| 6 |
|
| मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवले तर मी फजीत होणार नाही. |
|
| 7 |
|
| तुझे न्याय्य निर्णय मी शिकेन तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन. |
|
| 8 |
|
| मी तुझे नियम पाळीन; माझा सर्वस्वी त्याग करू नकोस. |
|
| 9 |
|
| तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. |
|
| 10 |
|
| अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस. |
|
| 11 |
|
| मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. |
|
| 12 |
|
| हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; तुझे नियम मला शिकव. |
|
| 13 |
|
| मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करतो. |
|
| 14 |
|
| तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा, असे मानून मी अत्यानंद करतो. |
|
| 15 |
|
| मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन. |
|
| 16 |
|
| मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही. |
|
| 17 |
|
| आपल्या दासाला औदार्य दाखव, म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन. |
|
| 18 |
|
| तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. |
|
| 19 |
|
| मी ह्या जगात केवळ उपरा आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नकोस. |
|
| 20 |
|
| तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव कासावीस झाला आहे. |
|
| 21 |
|
| गर्विष्ठांना तू धमकावतोस, तुझ्या आज्ञांपासून बहकणारे शापित आहेत. |
|
| 22 |
|
| निंदा व तिरस्कार माझ्यापासून दूर कर; कारण मी तुझे निर्बंध पाळतो. |
|
| 23 |
|
| अधिपतीही बसून आपसांत माझ्याविरुद्ध बोलतात; पण तुझा दास तुझ्या नियमांचे मनन करतो. |
|
| 24 |
|
| तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत. ते माझे मंत्री आहेत. |
|
| 25 |
|
| माझा जीव धुळीस मिळाला आहे; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. |
|
| 26 |
|
| मी आपला वर्तनक्रम तुझ्यापुढे मांडला आणि तू मला उत्तर दिलेस; तू आपले नियम मला शिकव. |
|
| 27 |
|
| तुझ्या विधींचा मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन. |
|
| 28 |
|
| माझा जीव खेदाने गळून जातो; तू आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे. |
|
| 29 |
|
| असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; करुणा करून तुझे नियमशास्त्र मला दे. |
|
| 30 |
|
| मी सत्याचा मार्ग निवडला आहे; मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत. |
|
| 31 |
|
| मी तुझे निर्बंध धरून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला फजीत होऊ देऊ नकोस. |
|
| 32 |
|
| तू माझे मन विकसित करतोस, तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावतो. |
|
| 33 |
|
| हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन. |
|
| 34 |
|
| मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन. |
|
| 35 |
|
| तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव; त्यांतच मला आनंद आहे. |
|
| 36 |
|
| माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे. |
|
| 37 |
|
| निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे. |
|
| 38 |
|
| तू आपले भय धरणार्यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधाने खरे कर. |
|
| 39 |
|
| मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. |
|
| 40 |
|
| पाहा, मला तुझ्या विधींचा ध्यास लागून राहिला आहे; तू आपल्या न्याय्यत्वाने मला नवजीवन दे. |
|
| 41 |
|
| हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो. तुझ्या वचनाप्रमाणे तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो; |
|
| 42 |
|
| म्हणजे माझी निंदा करणार्याला मला उत्तर देता येईल, कारण तुझ्या वचनावर माझा भरवसा आहे. |
|
| 43 |
|
| तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नकोस, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे. |
|
| 44 |
|
| म्हणजे मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन. |
|
| 45 |
|
| मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. |
|
| 46 |
|
| मी राजांसमोरसुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही. |
|
| 47 |
|
| मी तुझ्या आज्ञांत आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत. |
|
| 48 |
|
| तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आपले हात उभारीन. आणि तुझ्या नियमांचे मनन करीन. |
|
| 49 |
|
| तू आपल्या दासाला दिलेले वचन आठव, कारण तू मला आशा लावली आहेस. |
|
| 50 |
|
| माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते. |
|
| 51 |
|
| गर्विष्ठांनी माझा फार उपहास केला, तरी मी तुझ्या नियमशास्त्रापासून बहकलो नाही. |
|
| 52 |
|
| हे परमेश्वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान झाले आहे. |
|
| 53 |
|
| दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करतात, म्हणून मला फार संताप येतो. |
|
| 54 |
|
| माझ्या संसारयात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहेत. |
|
| 55 |
|
| हे परमेश्वरा, मी रात्री तुझ्या नावाचे स्मरण केले आहे. आणि तुझे नियमशास्त्र पाळले आहे. |
|
| 56 |
|
| मी तुझे विधी आचरले आहेत म्हणून मला हे प्राप्त झाले आहे. |
|
| 57 |
|
| परमेश्वर माझा वाटा आहे. तुझी वचने पाळण्याचा मी निश्चय केला आहे. |
|
| 58 |
|
| मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे. आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर. |
|
| 59 |
|
| आपल्या वर्तनक्रमाविषयी विचार करून मी तुझ्या निर्बंधांकडे पावले वळवली. |
|
| 60 |
|
| मी तुझ्या आज्ञा पाळण्याची त्वरा केली, मी विलंब लावला नाही. |
|
| 61 |
|
| दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टले, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. |
|
| 62 |
|
| तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुझे उपकारस्मरण करण्यास मी मध्यरात्री उठतो. |
|
| 63 |
|
| तुझे भय धरणार्या सर्वांचा, तुझे विधी पाळणार्यांचा, मी सोबती आहे. |
|
| 64 |
|
| हे परमेश्वरा, तुझ्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे; तू आपले नियम मला शिकव. |
|
| 65 |
|
| हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहेस. |
|
| 66 |
|
| विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे. |
|
| 67 |
|
| मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळत आहे. |
|
| 68 |
|
| तू चांगला आहेस, तू चांगले करतोस. तुझे नियम मला शिकव. |
|
| 69 |
|
| गर्विष्ठांनी माझ्यावर आळ घेतला आहे; तरी मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन. |
|
| 70 |
|
| त्यांचे मन कठीण झाले आहे; मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे. |
|
| 71 |
|
| मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. |
|
| 72 |
|
| सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे. |
|
| 73 |
|
| तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडवले; तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे. |
|
| 74 |
|
| तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करतील; कारण मी तुझ्या वचनाची आशा धरली आहे. |
|
| 75 |
|
| हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत, आणि सत्यतेने तू मला पिडले आहेस हे मी जाणतो. |
|
| 76 |
|
| तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे. |
|
| 77 |
|
| माझ्यावर करुणा कर म्हणजे मी जगेन; कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. |
|
| 78 |
|
| गर्विष्ठ फजीत होवोत, कारण त्यांनी लबाडीने माझ्यावर अन्याय केला आहे; मी तर तुझ्या विधींचे मनन करीन. |
|
| 79 |
|
| तुझे भय धरणारे माझ्याकडे पाहोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील. |
|
| 80 |
|
| मी लज्जित होऊ नये म्हणून माझे चित्त तुझ्या नियमांकडे पूर्णपणे लागू दे. |
|
| 81 |
|
| तू सिद्ध केलेल्या तारणाची उत्कंठा धरून माझा जीव व्याकूळ झाला आहे, पण मी तुझ्या वचनाची आशा धरतो. |
|
| 82 |
|
| तुझ्या वचनाचा ध्यास लागून माझे डोळे शिणले आहेत; “तू माझे सांत्वन केव्हा करशील” असे मी म्हणत आहे. |
|
| 83 |
|
| धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा मी झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही. |
|
| 84 |
|
| तुझ्या सेवकाचे दिवस कितीसे उरले आहेत? माझ्या पाठीस लागणार्यांना तू कधी शासन करशील? |
|
| 85 |
|
| गर्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेवल्या आहेत; ते तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे चालत नाहीत. |
|
| 86 |
|
| तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत; ते खोटेपणाने माझ्या पाठीस लागले आहेत, तू मला साहाय्य कर. |
|
| 87 |
|
| त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ नायनाट केला; तरी मी तुझे विधी सोडले नाहीत. |
|
| 88 |
|
| तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन. |
|
| 89 |
|
| हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे. |
|
| 90 |
|
| तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे; तू पृथ्वी स्थापली व ती तशीच कायम आहे. |
|
| 91 |
|
| तुझ्या निर्णयांविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत, कारण सर्व पदार्थ तुझे सेवक आहेत. |
|
| 92 |
|
| तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. |
|
| 93 |
|
| तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन दिले आहेस. |
|
| 94 |
|
| मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. |
|
| 95 |
|
| दुर्जन माझा नाश करण्यास टपले आहेत; तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन. |
|
| 96 |
|
| सर्व पूर्णतेला मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझी आज्ञा अत्यंत व्यापक आहे. |
|
| 97 |
|
| अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो. |
|
| 98 |
|
| तुझ्या आज्ञा मला आपल्या वैर्यांपेक्षा अधिक सुज्ञ करतात; कारण त्या सदोदित माझ्याजवळच आहेत. |
|
| 99 |
|
| माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो. |
|
| 100 |
|
| वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो. |
|
| 101 |
|
| तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो. |
|
| 102 |
|
| तुझ्या निर्णयांपासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकवले आहेस. |
|
| 103 |
|
| तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. |
|
| 104 |
|
| तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. |
|
| 105 |
|
| तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. |
|
| 106 |
|
| तुझे न्याय्य निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, व ती निश्चित केली आहे. |
|
| 107 |
|
| मी फार पिडलो आहे; हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. |
|
| 108 |
|
| हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर; तुझे निर्णय मला शिकव. |
|
| 109 |
|
| मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. |
|
| 110 |
|
| दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे, तरी तुझ्या विधींपासून मी बहकलो नाही. |
|
| 111 |
|
| तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. |
|
| 112 |
|
| तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लावले आहे. |
|
| 113 |
|
| मी दुटप्पी मनुष्यांचा द्वेष करतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. |
|
| 114 |
|
| तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस; मी तुझ्या वचनाची आशा धरतो. |
|
| 115 |
|
| अहो दुष्कर्म्यांनो, माझ्यापासून दूर व्हा म्हणजे मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन. |
|
| 116 |
|
| तू आपल्या वचनानुसार मला सांभाळ, म्हणजे मी जगेन; माझ्या आशेसंबंधाने मला फजीत होऊ देऊ नकोस. |
|
| 117 |
|
| मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन, आणि तुझ्या नियमांकडे निरंतर लक्ष ठेवीन. |
|
| 118 |
|
| तुझ्या नियमांपासून बहकणार्या सर्वांचा तू धिक्कार करतोस; त्यांचे कपट निरर्थक आहे. |
|
| 119 |
|
| पृथ्वीवरील सर्व दुर्जनांस तू गाळासारखे दूर करतोस; म्हणून तुझे निर्बंध मला प्रिय आहेत. |
|
| 120 |
|
| तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो; तुझ्या निर्णयांना मी भितो. |
|
| 121 |
|
| मी न्याय व नीती आचरली आहे; माझा छळ करणार्यांच्या हाती मला सोडून देऊ नकोस. |
|
| 122 |
|
| तू आपल्या दासाच्या हितासाठी जामीन हो; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नकोस. |
|
| 123 |
|
| तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतीक्षा करून करून माझे डोळे शिणले आहेत. |
|
| 124 |
|
| तू आपल्या वात्सल्यास अनुसरून आपल्या दासाला वागवून घे, आणि तू आपले नियम मला शिकव. |
|
| 125 |
|
| मी तुझा दास आहे, मला तुझ्या निर्बंधांचे ज्ञान व्हावे म्हणून तू मला बुद्धी दे. |
|
| 126 |
|
| परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे; |
|
| 127 |
|
| ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. |
|
| 128 |
|
| ह्यामुळे सर्व बाबीसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करतो. |
|
| 129 |
|
| तुझे निर्बंध आश्चर्यकारक आहेत, म्हणून माझा जीव ते पाळतो. |
|
| 130 |
|
| तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. |
|
| 131 |
|
| मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला. |
|
| 132 |
|
| तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची आवड धरणार्यांवर करतोस तशी कृपा माझ्यावर कर. |
|
| 133 |
|
| तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर, आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नकोस. |
|
| 134 |
|
| मनुष्याच्या जुलमापासून मला मुक्त कर, म्हणजे मी तुझे विधी पाळीन. |
|
| 135 |
|
| तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड; आणि तुझे नियम मला शिकव. |
|
| 136 |
|
| लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात. |
|
| 137 |
|
| हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस; तुझे निर्णय सरळ आहेत. |
|
| 138 |
|
| तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत. |
|
| 139 |
|
| माझ्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, कारण माझे शत्रू तुझी वचने विसरले आहेत. |
|
| 140 |
|
| तुझे वचन अगदी शुद्ध आहे; ते तुझ्या दासाला प्रिय आहे; |
|
| 141 |
|
| मी क्षुद्र व तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही. |
|
| 142 |
|
| तुझे न्याय्यत्व हे सनातन न्याय्यत्व आहे, आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे. |
|
| 143 |
|
| संकट व क्लेश ह्यांनी मला घेरले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे. |
|
| 144 |
|
| तुझे निर्बंध निरंतर न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन. |
|
| 145 |
|
| मी अगदी मनापासून तुझा धावा करतो; हे परमेश्वरा, माझे ऐक; मी तुझे नियम पाळीन. |
|
| 146 |
|
| मी तुझा धावा करतो; तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन. |
|
| 147 |
|
| उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो; मी तुझ्या वचनांची आशा धरतो. |
|
| 148 |
|
| तुझ्या वचनाचे चिंतन करायला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. |
|
| 149 |
|
| तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. |
|
| 150 |
|
| दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत; ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत. |
|
| 151 |
|
| हे परमेश्वरा, तू जवळ आहेस; तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. |
|
| 152 |
|
| तुझ्या निर्बंधांवरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापले आहेत. |
|
| 153 |
|
| माझे दुःख पाहा, त्यापासून मला सोडव; कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. |
|
| 154 |
|
| माझा वाद तू चालव, मला मुक्त कर; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. |
|
| 155 |
|
| तारण दुर्जनांपासून दूर आहे; कारण ते तुझ्या नियमांचा आश्रय करीत नाहीत. |
|
| 156 |
|
| हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे; तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. |
|
| 157 |
|
| माझ्या पाठीस लागणारे व माझे शत्रू पुष्कळ आहेत. तरी मी तुझ्या निर्बंधांपासून ढळलो नाही. |
|
| 158 |
|
| विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळत नाहीत. |
|
| 159 |
|
| तुझे विधी मी किती प्रिय मानतो ते पाहा; हे परमेश्वरा, तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे. |
|
| 160 |
|
| तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे; तुझे सर्व न्याय्य निर्णय सनातन आहेत. |
|
| 161 |
|
| अधिपती माझ्या पाठीस विनाकारण लागले आहेत; परंतु माझे हृदय तुझ्या वचनांचे भय धरते. |
|
| 162 |
|
| मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो. |
|
| 163 |
|
| मी असत्याचा द्वेष करतो व त्याचा वीट मानतो; परंतु तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. |
|
| 164 |
|
| तुझ्या न्याय्य निर्णयांसाठी मी दिवसातून सात वेळा तुझे स्तवन करतो. |
|
| 165 |
|
| तुझे नियमशास्त्र प्रिय मानणार्यांना फार शांती असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही. |
|
| 166 |
|
| हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी प्रतीक्षा करीत आहे; तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत. |
|
| 167 |
|
| माझा जीव तुझे निर्बंध पाळतो; व ते मला अत्यंत प्रिय आहेत. |
|
| 168 |
|
| मी तुझे विधी व तुझे निर्बंध पाळतो; कारण माझा सर्व वर्तनक्रम तुझ्यापुढे आहे. |
|
| 169 |
|
| हे परमेश्वरा, माझी आरोळी तुझ्यापर्यंत पोहचो; तू आपल्या वचनानुसार मला बुद्धी दे. |
|
| 170 |
|
| माझी विनंती तुझ्यापुढे येवो; तू आपल्या वचनानुसार मला मुक्त कर. |
|
| 171 |
|
| तू मला आपले नियम शिकवतोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो. |
|
| 172 |
|
| माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत. |
|
| 173 |
|
| तुझा हात मला साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण मी तुझे विधी स्वीकारले आहेत. |
|
| 174 |
|
| हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी उत्कंठा धरली आहे; तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. |
|
| 175 |
|
| माझा जीव वाचो, म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला साहाय्य करोत. |
|
| 176 |
|
| हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे; तू आपल्या दासाचा शोध कर; कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही. |
|
|
|
|