मराठी बायबल 2006
|
| 1 |
| मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने मला वाचवले. |
| 2 |
| परमेश्वरा, माझ्याविषयी खोट बोलणाऱ्या लोकांपासून मला वाचव. त्या लोकांनी खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगितल्या. |
| 3 |
| खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का? त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का? |
| 4 |
| सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि जळते निखारे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील. |
| 5 |
| खोटारड्यांनो, तुमच्याजवळ राहाणे म्हणजे मेशेखात राहाण्यासारखे आहे, केदारच्या तंबून राहाण्यासारखे आहे |
| 6 |
| शांतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांजवळ मी खूप काळ राहिलो आहे. |
| 7 |
| मी म्हणालो, मला शांती हवी, म्हणून त्यांना युध्द हवे आहे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/120.mp3
150
120