पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| संकटसमयी मी याहवेहकडे आरोळी मारली, आणि त्यांनी ती ऐकली. |
| 2 |
| हे याहवेह, असत्य बोलणार्या ओठांपासून व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा. |
| 3 |
| अगे कपटी जिभे, ते तुला काय करतील, आणखी तुला कशी वागणूक मिळेल? |
| 4 |
| ते तुला योद्ध्यांच्या तीक्ष्ण बाणांनी, केरसुणीच्या लाकडांच्या निखार्यांनी दंड करतील. |
| 5 |
| धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले, वा केदार येथे माझा डेरा घातला! |
| 6 |
| जे शांतिप्रिय नाहीत अशा लोकांसह राहण्यात मी बराच काळ घालविला आहे. |
| 7 |
| मी तर शांतताप्रिय आहे; पण मी काही बोलताच ते युद्धास तयार होतात. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/120.mp3
150
120