मराठी बायबल 2006
|
| 1 |
| मी वर डोंगरांकडे बघतो. पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे? |
| 2 |
| माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे. |
| 3 |
| देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही. |
| 4 |
| इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही. |
| 5 |
| परमेश्वर तुझा पाठीराखा आहे तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो. |
| 6 |
| दिवसा सूर्य तुला दु:ख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही. |
| 7 |
| परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील. |
| 8 |
| परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/121.mp3
150
121