×

पवित्र शास्त्र RV (Re-edited)

स्तोत्र १२१

1
आरोहणस्तोत्र. मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो; मला साहाय्य कोठून येईल?
2
आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य येते.
3
तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही; तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही.
4
पाहा, इस्राएलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही.
5
परमेश्वर तुझा रक्षक आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे.
6
दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही.
7
परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील. तुझ्या जिवाचे रक्षण करील.
8
परमेश्वर तुझे येणेजाणे येथून पुढे सर्वकाळ सुरक्षित करील.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide
:
टिपा जतन करा