पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| दाविदाचे आरोहणस्तोत्र. “आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ” असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. |
| 2 |
| हे यरुशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत. |
| 3 |
| हे यरुशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. |
| 4 |
| इस्राएलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश ― परमेशाचे वंश ― परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात, |
| 5 |
| कारण तेथे न्यायासने, दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहेत. |
| 6 |
| यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. “तुझ्यावर प्रीती करणार्यांचे कल्याण असो. |
| 7 |
| तुझ्या कोटात शांती वसो; तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो.” |
| 8 |
| माझे बंधू व माझे मित्र ह्यांच्यासाठी “तुझ्यामध्ये शांती वसो” अशी मी प्रार्थना करीन. |
| 9 |
| परमेश्वर आमचा देव ह्याच्या घरासाठी तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/122.mp3
150
122