पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| आरोहणस्तोत्र. हे स्वर्गात राजासनारूढ असणार्या, मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावतो. |
| 2 |
| पाहा, जसे दासांचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात. |
| 3 |
| हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर कृपा कर, कारण आमची पुरी नालस्ती होत आहे. |
| 4 |
| सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/123.mp3
150
123