पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| आरोहणस्तोत्र. ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्वकाळ टिकणार्या सीयोन डोंगरासारखे आहेत. |
| 2 |
| यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्वकाळ आपल्या लोकांसभोवती आहे. |
| 3 |
| नीतिमानांचे हात दुष्कर्माला लागू नयेत, म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानांच्या वतनांवर चालणार नाही. |
| 4 |
| हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत, त्यांचे कल्याण कर. |
| 5 |
| जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्म्यांबरोबर घालवून देईल. इस्राएलास शांती असो. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/125.mp3
150
125