पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत, कारण ते कधीही ढळत नाहीत, तर सर्वकाळ टिकतात. |
| 2 |
| यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात, तसेच आता आणि सदासर्वकाळ, याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात. |
| 3 |
| नीतिमान लोकांना दिलेल्या वतनावर दुष्टांचा राजदंड टिकून राहणार नाही, नाहीतर नीतिमान लोकही त्यांच्या हाताने दुष्टता करतील. |
| 4 |
| हे याहवेह, जे नीतिमान आहेत, ज्यांचे हृदय निष्ठावंत आहे, त्यांचे तुम्ही कल्याण करा. |
| 5 |
| परंतु जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात, त्यास याहवेह दुष्कर्म्यांबरोबर घालवून देतील. इस्राएलावर शांती असो. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/125.mp3
150
125