×

मराठी बायबल 2006

स्तोत्र १२६

1
परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
2
आपण हसत आनंदाचे गाणे गात असू. इतर देशांतील लोक म्हणतील, “इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
3
होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली तर आपण खूप आनंदी होऊ.
4
परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात. तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
5
एखादा माणूस बी पेरते वेळी दु:खी असू शकेल. पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
6
तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दु:खी होईल. पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.
Marathi Bible 2006
Marathi Bible: Easy-to-Read Version 2006 World Bible Translation Center
:
टिपा जतन करा