पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| शलमोनाचे आरोहणस्तोत्र. परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकर्यांचे जागरण व्यर्थ आहे. |
| 2 |
| तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे; तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. |
| 3 |
| पाहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे. |
| 4 |
| तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत. |
| 5 |
| ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! वेशीवर शत्रूंशी त्यांची बोलाचाली होत असता ते फजीत होणार नाहीत. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/127.mp3
150
127