पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| आरोहणस्तोत्र. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य! |
| 2 |
| तू आपल्या श्रमांचे फळ खाशील; तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. |
| 3 |
| तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल; तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील. |
| 4 |
| पाहा, परमेश्वराचे भय धरणार्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. |
| 5 |
| परमेश्वर सीयोनेतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. |
| 6 |
| तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्राएलास शांती असो. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/128.mp3
150
128