पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| याहवेह, आणखी किती काळ? सर्वकाळ तुम्ही मला विसरणार का? किती काळ तुम्ही मजपासून तुमचे मुख लपविणार? |
| 2 |
| मी किती काळ माझ्या विचारांशी द्वंद करावे? कुठवर दुःखाने रात्रंदिवस माझे हृदय व्यापून टाकावे? कुठवर माझ्या शत्रूंनी मजवर वरचढ व्हावे? |
| 3 |
| याहवेह, माझ्या परमेश्वरा, मजकडे पाहा आणि मला उत्तर द्या. या अंधारात माझ्या डोळ्यांना प्रकाश द्या, नाहीतर मजवर चिरनिद्रा ओढवेल. |
| 4 |
| माझे शत्रू म्हणतील “मी त्याला पराभूत केले आहे,” आणि माझ्या पतनाबद्दल ते आनंदित होतील. |
| 5 |
| कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तुमच्या तारणात हर्ष करीत आहे. |
| 6 |
| मी याहवेहची स्तुती गाईन, कारण त्यांनी माझ्यावर उपकार केले आहेत. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/013.mp3
150
13