|
| 1 |
|
| परमेशाचे स्तवन करा!2 परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा; परमेश्वराचे सेवकहो, स्तवन करा; |
|
| 2 |
|
| परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा. |
|
| 3 |
|
| परमेशाचे स्तवन करा,2 कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे. |
|
| 4 |
|
| कारण परमेशाने आपणासाठी याकोबाला निवडले आहे, आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्राएलास निवडून घेतले आहे. |
|
| 5 |
|
| परमेश्वर थोर आहे; आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा थोर आहे हे मी जाणतो. |
|
| 6 |
|
| परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयांत करतो. |
|
| 7 |
|
| तो दिगंतांपासून मेघ वर चढवतो, पावसासाठी विजा उत्पन्न करतो; तो आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो. |
|
| 8 |
|
| त्याने मिसर देशातील मनुष्यांचे व पशूंचेही प्रथमजन्मलेले मारून टाकले. |
|
| 9 |
|
| हे मिसर देशा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यावर चिन्हे व उत्पात पाठवले. |
|
| 10 |
|
| त्याने अनेक राष्ट्रांचा मोड केला; बलवान राजे मारून टाकले; |
|
| 11 |
|
| अमोर्यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्यांना मारून टाकले; कनान देशातील सर्व राज्यांचा मोड केला; |
|
| 12 |
|
| आणि त्यांचा देश त्याने वतन करून दिला; आपले लोक इस्राएल ह्यांना वतन करून दिला. |
|
| 13 |
|
| हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकाल राहील; हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील. |
|
| 14 |
|
| कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल. |
|
| 15 |
|
| राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत, त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. |
|
| 16 |
|
| त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही. |
|
| 17 |
|
| त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; आणि त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही. |
|
| 18 |
|
| त्या बनवणारे व त्याच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. |
|
| 19 |
|
| हे इस्राएलाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; |
|
| 20 |
|
| हे लेवीच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; परमेश्वराचे भय धरणार्यांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. |
|
| 21 |
|
| यरुशलेमेत वस्ती करणार्या परमेश्वराचा धन्यवाद सीयोनेतून होवो. परमेशाचे स्तवन करा!1 |
|
|
|
|