|
| 1 |
|
| परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 2 |
|
| देवांच्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 3 |
|
| परमेश्वरांच्या परमेश्वराची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 4 |
|
| देवाची, जो एकमेव अद्भुत चमत्कार करतो त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 5 |
|
| ज्याने आकाश निर्माण करण्यासाठी शहाणपणा वापरला त्याची, देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 6 |
|
| देवाने समुद्रावर शुष्क जमीन ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 7 |
|
| देवाने मोठा प्रकाश निर्माण केला. त्याचे प्रेम सदैव असते. |
|
| 8 |
|
| दिवसावर राज्य करण्यासाठी देवाने सूर्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 9 |
|
| देवाने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि चांदण्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 10 |
|
| देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या पहिल्या पुरुषांना आणि प्राण्यांना मारले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 11 |
|
| देवाने इस्राएलला मिसरमधून बाहेर काढले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 12 |
|
| देवाने त्याची महान शक्ती आणि बळ दाखविले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 13 |
|
| देवाने लाल समुद्र दोन भागात विभागला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 14 |
|
| देवाने इस्राएलला समुद्रामधून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 15 |
|
| देवाने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात बुडवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 16 |
|
| देवाने त्याच्या माणसांना वाळवंटातून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 17 |
|
| देवाने शक्तिशाली राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 18 |
|
| देवाने बलवान राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 19 |
|
| देवाने अमोऱ्यांच्या सिहोन राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 20 |
|
| देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 21 |
|
| देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 22 |
|
| देवाने ती जमीन इस्राएलला नजराणा म्हणून दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 23 |
|
| आमचा पराभव झाला तेव्हा देवाने आमची आठवण ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 24 |
|
| देवाने आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 25 |
|
| देव प्रत्येक माणसाला अन्न देतो. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
| 26 |
|
| स्रवर्गातल्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. |
|
|
|
|