मराठी बायबल 2006
|
| 1 |
| आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो आणि सियोनची आठवण काढून रडलो. |
| 2 |
| आम्ही जवळच्या वाळुंज झाडावर आमच्या वीणा ठेवल्या. |
| 3 |
| बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले. त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले. त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले. |
| 4 |
| परंतु परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे गाऊ शकत नाही. |
| 5 |
| यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते. |
| 6 |
| यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते. मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो. |
| 7 |
| यरुशलेम नेहमी माझा सर्वांत मोठा आनंद असेल असे मी वचन देतो. |
| 8 |
| बाबेल, तुझा नाश होईल. जो तुला तुझ्या योग्य अशी शिक्षा देईल त्याला देव आशीर्वाद देईल. तू जसा आम्हाला दु:ख देतोस तसेच दु:ख जो तुला देईल त्याला धन्यवाद. |
| 9 |
| जो माणूस तुझी मुले धरतो आणि त्यांना दगडावर आपटून ठार मारतो त्याचा धन्यवाद असो. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/137.mp3
150
137