पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो; हो, तेथे आम्हांला सीयोनेची आठवण झाली; तेव्हा आम्ही रडलो. |
| 2 |
| तेथील वाळुंजांवर आम्ही आपल्या वीणा टांगून ठेवल्या, |
| 3 |
| कारण तेथे आमचा पाडाव करणार्यांनी आम्हांला गाणी गायला सांगितले आमचा छळ करणार्यांनी आम्हांला त्यांची करमणूक करण्यास सांगितले. ते म्हणाले, “आम्हांला सीयोनेचे एखादे गाणे गाऊन दाखवा.” |
| 4 |
| आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे? |
| 5 |
| हे यरुशलेमे, जर मी तुला विसरलो तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो. |
| 6 |
| जर मी तुझी आठवण ठेवली नाही, जर मी यरुशलेमेला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. |
| 7 |
| हे परमेश्वरा, अदोमी लोकांविरुद्ध यरुशलेमेच्या त्या दिवसाची आठवण ठेव; ते म्हणाले, “ती पाडून टाका, पायापर्यंत जमीनदोस्त करा.” |
| 8 |
| हे बाबेलच्या कन्ये, तू ओसाड पडणार आहेस; तू आमच्याशी केलेल्या वर्तनांबद्दल जो तुझे पारिपत्य करील तो धन्य! |
| 9 |
| जो तुझी बाळके धरून खडकावर आपटील तो धन्य! |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/137.mp3
150
137