पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| दाविदाचे स्तोत्र. मी अगदी मनापासून तुझे उपकारस्मरण करीन; देवांच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. |
| 2 |
| तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन, तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करीन; कारण तू आपल्या संपूर्ण नावांहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस. |
| 3 |
| मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास; तू मला हिम्मत दिलीस तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले. |
| 4 |
| हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकारस्मरण करतील; कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत. |
| 5 |
| ते परमेश्वराच्या मार्गांविषयी गातील; कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. |
| 6 |
| परमेश्वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो; पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. |
| 7 |
| मी संकटांतून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस; माझ्या वैर्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस, आणि तुझा उजवा हात माझा बचाव करतो. |
| 8 |
| परमेश्वर माझ्याविषयी सर्वकाही सिद्धीस नेईल; हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे; तू आपल्या हातचे काम सोडू नकोस. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/138.mp3
150
138