|
| 1 |
|
| याहवेह, तुम्ही मला पारखले आहे आणि मला ओळखले आहे. |
|
| 2 |
|
| माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता; दुरून देखील तुम्हाला माझा प्रत्येक विचार समजतो. |
|
| 3 |
|
| माझे जाणे-येणे व विश्रांती घेणे, हे देखील तुम्ही ओळखून आहात; माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे. |
|
| 4 |
|
| हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच, ते सर्व तुम्हाला माहीत असतात. |
|
| 5 |
|
| तुम्ही माझ्यापुढे व मागे, माझ्या सभोवती असता; तुम्ही आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आहे. |
|
| 6 |
|
| हे ज्ञान इतके भव्य व अद्भुत आहे, की इतक्या उदात्ततेपर्यंत पोहोचणे मला अशक्य आहे. |
|
| 7 |
|
| तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ? तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू? |
|
| 8 |
|
| मी वर स्वर्गात गेलो, तरी तिथे तुम्ही आहात; अधोलोकात माझे अंथरूण केले, तर तिथेही तुम्ही आहातच. |
|
| 9 |
|
| मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन अत्यंत दूरच्या महासागरापलिकडे वस्ती केली, |
|
| 10 |
|
| तर तिथेही तुमचा हात मला धरून चालवील; तुमचा उजवा हात मला आधार देईल. |
|
| 11 |
|
| मी म्हणालो, “अंधार मला लपवून टाकेल, आणि माझ्या सभोवतीचा प्रकाश रात्रीत बदलून जाईल,” |
|
| 12 |
|
| अंधकार देखील तुमच्यापुढे अंधकार नाही, कारण तुमच्यापुढे रात्र दिवसासारखीच प्रकाशमान आहे; कारण अंधकार हा तुम्हाला प्रकाशासमान आहे. |
|
| 13 |
|
| माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे; माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली. |
|
| 14 |
|
| मी तुमची स्तुती करतो, कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे; तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे, हे मी पूर्णपणे जाणतो. |
|
| 15 |
|
| गुप्तस्थानी माझी निर्मिती होत असताना, जेव्हा माझा सांगाडा तुमच्यापासून लपलेला नव्हता, जेव्हा पृथ्वीच्या गर्भामध्ये माझी घडण होत होती. |
|
| 16 |
|
| तुमच्या नेत्रांनी मला पिंडरूपात पाहिले; माझा एकही दिवस उगविण्यापूर्वी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसाची तुम्ही लेखी नोंद केली. |
|
| 17 |
|
| हे परमेश्वरा, माझ्याबद्दलचे तुमचे विचार किती मौल्यवान आहेत! अबब, किती अगणित आहेत ते! |
|
| 18 |
|
| जर मी त्याची गणती केली, तर ती वाळूच्या कणापेक्षाही अधिक होईल— मी सकाळी जागा होतो, तेव्हाही मी तुमच्या समक्षतेत असतो. |
|
| 19 |
|
| हे परमेश्वरा, दुष्ट लोकांचा तुम्ही नायनाट केला तर किती बरे होईल! अहो रक्तपिपासू लोकांनो, माझ्यापासून दूर व्हा! |
|
| 20 |
|
| ते तुमच्याविरुद्ध दुष्टपणाच्या गोष्टींची योजना करतात; तुमचे शत्रू तुमच्या नामाचा गैरवापर करतात. |
|
| 21 |
|
| याहवेह, तुमचा द्वेष करणार्यांचा मीही द्वेष करू नये काय आणि तुमच्याशी बंडखोरी करणार्यांचा मी तिरस्कार करू नये काय? |
|
| 22 |
|
| मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो; मी त्यांना माझे शत्रू मानतो. |
|
| 23 |
|
| हे परमेश्वरा, माझे परीक्षण करा आणि माझे अंतःकरण पारखून पहा; माझे चिंताग्रस्त विचार बारकाईने तपासून पाहा. |
|
| 24 |
|
| बघा की एखादी वाईट प्रवृत्ती तर माझ्यात नाही, आणि मग मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने घेऊन जा. |
|
|
|
|