पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो; माझ्याकडे सत्वर ये; मी तुझा धावा करतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे. |
| 2 |
| माझी प्रार्थना तुझ्यासमोर धूपाप्रमाणे माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो. |
| 3 |
| हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. |
| 4 |
| अनीती करणार्या मनुष्यांबरोबर मी दुराचरण करू नये म्हणून माझे मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नकोस; आणि मला त्यांची मिष्टान्ने खाऊ देऊ नकोस. |
| 5 |
| नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल. तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही; कारण दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन. |
| 6 |
| त्यांच्या अधिपतींना कड्यावरून लोटून दिले आहे, आणि ते माझी वचने ऐकतील कारण ती मधुर आहेत. |
| 7 |
| जमीन नांगरताना व ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशी आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत. |
| 8 |
| तरी हे प्रभू परमेश्वरा, माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; मी तुझ्यावर भरवसा टाकला आहे; माझा जीव जाऊ देऊ नकोस. |
| 9 |
| त्यांनी माझ्यासाठी मांडलेल्या पाशापासून आणि दुष्कर्म्यांच्या सापळ्यांपासून मला राख. |
| 10 |
| दुर्जन आपल्याच जाळ्यात पडोत; मी तर त्यातून साफ निसटून जाईन. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/141.mp3
150
141