पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| दाविदाचे मस्कील (बोधपर स्तोत्र); गुहेत असताना त्याने केलेली प्रार्थना. मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारतो; आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करतो. |
| 2 |
| मी त्याच्यापुढे आपले गार्हाणे मांडतो; मी आपले संकट त्याला सांगतो. |
| 3 |
| माझ्या ठायी माझा आत्मा व्याकूळ झाला आहे; तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे; मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश मांडला आहे. |
| 4 |
| माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पाहा, मला ओळखणारा कोणी नाही; मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची पर्वा करणारा कोणी नाही. |
| 5 |
| हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; मी म्हणतो, तूच माझा आश्रय आहेस, जिवंतांच्या भूमीत तू माझा वाटा आहेस. |
| 6 |
| माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणार्यांपासून तू मला सोडव, कारण ते माझ्यापेक्षा बलिष्ठ आहेत. |
| 7 |
| मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करावे म्हणून तू माझा जीव बंदीतून काढ; तू मला औदार्य दाखवतोस, म्हणून नीतिमान माझ्याभोवती जमतील. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/142.mp3
150
142