पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर जो माझा दुर्ग त्याचा धन्यवाद होवो; तो माझ्या हातांना लढायला शिकवतो; माझ्या बोटांना युद्ध करायला शिकवतो. |
| 2 |
| तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे; मी त्याचा आश्रय धरतो; तो माझ्या प्रजाजनांना माझे अंकित करतो. |
| 3 |
| हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावीस? मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावेस? |
| 4 |
| मनुष्य श्वासवत आहे; त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे. |
| 5 |
| हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; पर्वतांना स्पर्श कर म्हणजे ते धुमसतील. |
| 6 |
| वीज पाडून त्यांची दाणादाण कर; तू आपले बाण सोडून त्यांची धांदल उडव. |
| 7 |
| वरून आपले हात लांब कर; व महापुरांतून, परक्यांच्या हातातून, मला सोडवून मुक्त कर. |
| 8 |
| त्यांचे मुख असत्य बोलते; त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे. |
| 9 |
| हे देवा, मी तुला नवे गीत गाईन; दशतंतू वीणेवर मी तुझे स्तोत्र गाईन; |
| 10 |
| तूच राजांना तारण देणारा आहेस; तूच आपला सेवक दावीद ह्याला दुष्टांच्या तलवारीपासून मुक्त करणारा आहेस. |
| 11 |
| मला परक्यांच्या हातातून सोडवून मुक्त कर; त्यांचे मुख असत्य बोलते; त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे. |
| 12 |
| आमचे पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोपांसारखे असावेत; आमच्या कन्या राजवाड्यांच्या कोपर्यात कोरलेल्या खांबांसारख्या असाव्यात; |
| 13 |
| आमची भांडारे भरलेली असावीत; त्यांतून सर्व प्रकारच्या वस्तू मिळाव्यात; आमच्या कुरणांत आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत; |
| 14 |
| आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यांत नसावेत; |
| 15 |
| अशी ज्या लोकांची स्थिती असेल ते धन्य! ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते धन्य! |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/144.mp3
150
144