|
| 1 |
|
| दाविदाचे स्तोत्र. हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. |
|
| 2 |
|
| मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. |
|
| 3 |
|
| परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; त्याची थोरवी अगम्य आहे. |
|
| 4 |
|
| एक पिढी दुसर्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील. |
|
| 5 |
|
| तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये ह्यांचे मी मनन करीन. |
|
| 6 |
|
| तुझ्या भयावह कृत्यांचा पराक्रम लोक विदित करतील; मी तुझी थोरवी वर्णन करीन. |
|
| 7 |
|
| ते तुझ्या परमदयेची आठवण काढतील; व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करतील. |
|
| 8 |
|
| परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे; तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे. |
|
| 9 |
|
| परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. |
|
| 10 |
|
| हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात; आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करतात. |
|
| 11 |
|
| ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णन करतात, आणि तुझा पराक्रम कथन करतात; |
|
| 12 |
|
| ह्यासाठी की, तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळावी. |
|
| 13 |
|
| तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. |
|
| 14 |
|
| पतन पावणार्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, व वाकलेल्या सर्वांना उभे करतो. |
|
| 15 |
|
| सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात; आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. |
|
| 16 |
|
| तू आपली मूठ उघडून सर्व प्राणिमात्रांची इच्छा पुरी करतोस. |
|
| 17 |
|
| परमेश्वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यांत दयाळू आहे. |
|
| 18 |
|
| जे कोणी त्याचा धावा करतात, जे खर्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. |
|
| 19 |
|
| तो आपले भय धरणार्यांची इच्छा पुरवतो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो. |
|
| 20 |
|
| परमेश्वर आपल्यावर प्रेम करणार्या सर्वांचे रक्षण करतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करतो. |
|
| 21 |
|
| माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील; सर्व प्राणिमात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानुयुग करोत. |
|
|
|
|