|
| 1 |
|
| याहवेहचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाणे किती मनोरम, किती यथार्थ आहे! |
|
| 2 |
|
| यरुशलेम याहवेहची निर्मिती आहे; इस्राएलाच्या निर्वासितांचे तिथे पुनर्वसन करत आहेत. |
|
| 3 |
|
| भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात, आणि त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतात. |
|
| 4 |
|
| ते तार्यांची गणती करतात आणि त्यांनी प्रत्येकास नाव दिलेले आहे. |
|
| 5 |
|
| ते अत्यंत महान आहेत आणि त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे; त्यांची बुद्धी अपरिमित आहे. |
|
| 6 |
|
| याहवेह नम्रजनांस आधार देतात, परंतु दुर्जनास बहिष्कृत करतात. |
|
| 7 |
|
| याहवेहच्या उपकारस्तुतीची गीते गा; वीणेच्या साथीवर आमच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा. |
|
| 8 |
|
| ते मेघांनी आकाश व्यापून टाकतात; पावसाच्या सरी भूमीवर पाठवितात आणि डोंगरावर हिरवे गवत रुजवितात. |
|
| 9 |
|
| ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात व हाक मारणार्या कावळ्यांच्या पिलांना अन्न देतात. |
|
| 10 |
|
| घोड्यांचे बल त्यांना प्रसन्न करीत नाही, मानवाचे सामर्थ्यवान पायही त्यांना संतुष्ट करीत नाही. |
|
| 11 |
|
| याहवेह त्यांचे भय बाळगणार्यांवर संतुष्ट असतात, तसेच जे त्यांच्या प्रेमदयेची आशा धरतात. |
|
| 12 |
|
| यरुशलेम, याहवेहचा महिमा कर; सीयोने, आपल्या परमेश्वराची स्तुती कर. |
|
| 13 |
|
| कारण त्यांनी तुझ्या वेशींचे स्तंभ बळकट केले आहेत आणि त्या नगरातील तुझ्या लोकांस आशीर्वाद दिला आहे. |
|
| 14 |
|
| ते तुझ्या सर्व सीमांत शांतता प्रस्थापित करतात; ते उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतात. |
|
| 15 |
|
| ते आपल्या आज्ञा पृथ्वीवर पाठवितात; त्यांचा शब्द वायुवेगाने पसरतो. |
|
| 16 |
|
| शुभ्र लोकरीसारख्या हिमाचा ते वर्षाव करतात आणि हिमकण जमिनीवर राखेसारखे विखुरतात. |
|
| 17 |
|
| ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात. त्यांच्या गोठविणार्या थंडीपुढे कोण टिकेल? |
|
| 18 |
|
| परंतु नंतर ते उष्ण हवेला आज्ञा करतात, तेव्हा हिम वितळते आणि जलप्रवाह वाहू लागतो. |
|
| 19 |
|
| त्यांनी आपले वचन याकोबाला विदित केलेले आहेत आणि विधी व नियम इस्राएलला स्पष्ट केले आहेत. |
|
| 20 |
|
| इतर कोणत्याही राष्ट्राकरिता त्यांनी असे केले नाही; ते त्यांच्या आज्ञांबाबत अज्ञानी आहेत. याहवेहचे स्तवन करा. |
|
|
|
|