पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| परमेशाचे स्तवन करा!1 आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा; उर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. |
| 2 |
| अहो त्याच्या सर्व दिव्यदूतांनो, त्याचे स्तवन करा; त्याच्या सर्व सैन्यांनो, त्याचे स्तवन करा; |
| 3 |
| अहो सूर्यचंद्रहो, त्याचे स्तवन करा; सर्व प्रकाशमय तार्यांनो, त्याचे स्तवन करा. |
| 4 |
| आकाशांवरील आकाशांनो, आकाशांवरील जलांनो, त्याचे स्तवन करा. |
| 5 |
| ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. |
| 6 |
| त्याने ती सर्वकाळासाठी स्थापली; त्याने नियम लावून दिला त्याचे उल्लंघन कोणी करणार नाही. |
| 7 |
| पृथ्वीवरून परमेश्वराचे स्तवन करा; मोठेमोठे जलचर व सर्व जलाशय, |
| 8 |
| अग्नी, गारा, हिम व धुके, त्याची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ, |
| 9 |
| पर्वत व सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधसरू, |
| 10 |
| वनपशू व सर्व ग्रामपशू सरपटणारे प्राणी व उडणारे पक्षी, |
| 11 |
| पृथ्वीवरील राजे व सर्व प्रजा, अधिपती व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, |
| 12 |
| कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण |
| 13 |
| ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत; कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे; त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशांच्या वर आहे. |
| 14 |
| आणि त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कर्ष केला आहे;2 तो आपल्या सर्व भक्तांना, त्याच्याजवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्राएलाच्या संततीला स्तुतिपात्र आहे. परमेशाचे स्तवन करा!1 |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/148.mp3
150
148