पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| याहवेहचे स्तवन करा. आकाशमंडलातून त्यांचे स्तवन करा; ऊर्ध्वलोकी त्यांचे स्तवन करा. |
| 2 |
| त्यांचे सर्व स्वर्गदूत, त्यांचे स्तवन करो; त्यांची सर्व स्वर्गीय सेना, त्यांचे स्तवन करो. |
| 3 |
| सूर्य आणि चंद्रमा त्यांचे स्तवन करा; सर्व चमकत्या तारकांनो, त्यांचे स्तवन करा. |
| 4 |
| हे सर्वोच्च आकाशांनो, आणि आकाशाच्याही वरील जलांनो, त्यांचे स्तवन करा. |
| 5 |
| त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो, कारण त्यांनी आज्ञा दिली आणि ती अस्तित्वात आली. |
| 6 |
| आणि त्यांनी त्यांची स्थापना सदासर्वकाळासाठी केली आहे— त्यांची राजाज्ञा कधीही रद्द केली जाणार नाही. |
| 7 |
| पृथ्वीवर याहवेहचेच स्तवन होवो, खोल महासागर व त्यातील समस्त विशालकाय प्राण्यांनो, |
| 8 |
| विजा व गारा, हिम व धुके, तसेच वादळी वारे, त्यांचे स्तवन करोत. |
| 9 |
| अहो पर्वतांनो व सर्व टेकड्यांनो, फळझाडे व समस्त गंधसरू, |
| 10 |
| हिंस्र पशू आणि सर्व गुरे, सूक्ष्म जीव व उडणारे पक्षी, |
| 11 |
| पृथ्वीवरील राजे व सर्व राष्ट्रे, अहो अधिपती व त्यांच्या न्यायाधीशांनो, |
| 12 |
| युवक व युवतींनो, वृद्ध व बालके. |
| 13 |
| तुम्ही सर्व याहवेहचे स्तवन करा, कारण केवळ त्यांच्याच नामाला महिमा मिळो; त्यांचे ऐश्वर्य पृथ्वी आणि आकाशाहून महान आहे. |
| 14 |
| त्यांनी त्यांच्या लोकांचे शिंग उभारले आहे, ते त्यांच्या सर्व नीतिमान भक्तांना, त्यांच्या अंतःकरणासमीप, त्यांना अत्यंत प्रिय अशा इस्राएली लोकांना स्तवन पात्र केले आहे. याहवेहचे स्तवन करा. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/148.mp3
150
148