मराठी बायबल 2006
|
| 1 |
| परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्याबद्दलचे नवे गाणे गा. ज्या सभेत त्याचे भक्त भेटतात त्या सभेत त्याचे गुणगान करा. |
| 2 |
| इस्राएलाच्या लोकांना त्यांच्या निर्मात्याबरोबर आनंदोत्सव साजरा करु द्या. सियोनच्या लोकांना त्यांच्या राजाबरोबर आनंद उपभोगू द्या. |
| 3 |
| त्या लोकांना डफाच्या आणि वीणेच्या तालावर नाच करुन देवाची स्तुती करु द्या. |
| 4 |
| परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे. देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला. |
| 5 |
| देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा. झोपी गेल्यावरही आनंदी राहा. |
| 6 |
| लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या आणि त्यांना त्यांच्या तलवाडी हातात घेऊ द्या. |
| 7 |
| त्यांना त्यांच्या शत्रूंना शिक्षा करु द्या. त्यांना त्या लोकांना शिक्षा करु द्या. |
| 8 |
| देवाचे लोक त्या राजांना आणि महत्वाच्या लोकांना साखळंदडाने बांधतील. |
| 9 |
| देवाने आज्ञा केल्याप्रमाणे देवाचे लोक त्यांना शिक्षा करतील. देवाचे सगळे भक्त त्याला मान देतात. परमेश्वराचे गुणगान करा |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/149.mp3
150
149