पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| याहवेहचे स्तवन करा. याहवेहसाठी एक नवे गीत गा, त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत. |
| 2 |
| हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर; अहो सीयोनकरांनो, आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावा. |
| 3 |
| त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत, डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा. |
| 4 |
| कारण याहवेहला आपल्या लोकांमुळे संतोष होतो; ते नम्रजनांस विजयी करतात. |
| 5 |
| या सन्मानामुळे त्यांचे सात्विक उल्लास करोत आणि आपल्या अंथरुणावर हर्षगीते गावोत. |
| 6 |
| त्यांच्या मुखात परमेश्वराची आराधना असो आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात धारण करून, |
| 7 |
| राष्ट्रांसाठी त्यांनी नेमलेल्या शिक्षा अंमलात आणण्यास सिद्ध व्हावे; |
| 8 |
| त्या राष्ट्रांच्या राजांना बेड्या घाला आणि त्यांच्या पुढार्यांना लोखंडी साखळदंडानी बांधा. |
| 9 |
| त्यांना दिलेल्या शिक्षांची अंमलबजावणी करा. हाच याहवेहच्या विश्वासू लोकांचा गौरव आहे. याहवेहचे स्तवन करा. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/149.mp3
150
149