पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल? |
| 2 |
| ज्याचे चालणे निर्दोष आहे, जो धार्मिकतेचे आचरण करतो, जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो; |
| 3 |
| जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही, जो आपल्या शेजार्यांचे वाईट करीत नाही, आणि इतरांना काळिमा लावत नाही; |
| 4 |
| जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो, याहवेहचे भय धरणार्यांचा सन्मान करतो, आणि जो स्वतःचे नुकसान होत असले तरी दिलेले वचन पाळतो; |
| 5 |
| जो व्याज न आकारता पैसे उसने देतो; जो निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही, जो कोणी या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/015.mp3
150
15