मराठी बायबल 2006
|
| 1 |
| परमेश्वराची स्तुती करा देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा. |
| 2 |
| देव ज्या महान गोष्टी करतो त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या सर्व मोठेपणाबद्दल त्याची स्तुती करा. |
| 3 |
| तुतारी आणि कर्णा वाजवून देवाचे गुणगान करा. सतारीवर आणि वीणेवर त्याचे गुणगान करा. |
| 4 |
| डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा. तंतुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा. |
| 5 |
| जोर जोरात टाळ वाजवून देवाची स्तुती करा. झणझणणाऱ्या झांजांवर त्याचे गुणगान करा. |
| 6 |
| प्रत्येक जिवंत वस्तू परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/150.mp3
150
150