पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| परमेशाचे स्तवन करा!1 देवाचे त्याच्या पवित्रस्थानी स्तवन करा; त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा. |
| 2 |
| त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा; त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा. |
| 3 |
| कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा. सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा. |
| 4 |
| डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा. तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा. |
| 5 |
| खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा. झणझणणार्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. |
| 6 |
| प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा!1 |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/150.mp3
150
150