पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| दाविदाचे मिक्ताम नावाचे स्तोत्र. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. |
| 2 |
| मी परमेश्वराला म्हटले, “तूच माझा प्रभू आहेस, तुझ्यापरते मला सुख नाही.” |
| 3 |
| पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत, त्यांच्या ठायी माझा सगळा संतोष आहे. |
| 4 |
| जे परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दु:खे होतील; ते रक्तमय पेयार्पणे अर्पण करतात तशी मी अर्पण करणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नांवे उच्चारणारही नाही. |
| 5 |
| परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे; माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. |
| 6 |
| माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. |
| 7 |
| परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो; माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते. |
| 8 |
| मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. |
| 9 |
| म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्लासतो; माझा देहही सुरक्षित राहतो. |
| 10 |
| कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस; |
| 11 |
| जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/016.mp3
150
16