पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| परमेश्वरा, माझे रक्षण करा, कारण मी तुमच्या आश्रयाला आलो आहे. |
| 2 |
| मी याहवेहला म्हणालो, “तुम्हीच माझे प्रभू आहात; तुमच्याशिवाय दुसरे चांगले असे काहीच माझ्याकडे नाही.” |
| 3 |
| पृथ्वीवरील लोक जे पवित्र आहेत, “ते आदरणीय आहेत, त्यांच्याठायी मी प्रसन्न आहे.” |
| 4 |
| जे अन्य दैवतांच्या भजनी लागतात, ते अनेक दुःखांनी ग्रासले जातील. अशा दैवतांना मी रक्तमय पेयार्पणे अर्पिणार नाही किंवा त्यांची नावेही मी माझ्या ओठांनी उच्चारणार नाही. |
| 5 |
| याहवेह तुम्हीच माझे वतन, माझा प्याला आहात; तुम्हीच माझा वाटा सुरक्षित करता. |
| 6 |
| माझ्या वाट्याला सीमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत; माझ्यासाठी खरोखरच एक सुंदर वारसा आहे. |
| 7 |
| मी याहवेहची स्तुती करणार, ज्यांनी माझे मार्गदर्शन केले आहे; रात्रीच्या समयी माझे अंतःकरण मला बोध करते. |
| 8 |
| मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे; ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही. |
| 9 |
| यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील सुरक्षिततेत विसावा घेईल. |
| 10 |
| कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही; किंवा तुमच्या विश्वासणार्याला तुम्ही कुजणे पाहू देणार नाही. |
| 11 |
| तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल, तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/016.mp3
150
16