पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र. आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते |
| 2 |
| दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. |
| 3 |
| वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही. |
| 4 |
| तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. |
| 5 |
| शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो; तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. |
| 6 |
| आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसर्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो; त्याच्या उष्णतेपासून काहीएक सुटत नाही. |
| 7 |
| परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो. |
| 8 |
| परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात; परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. |
| 9 |
| परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत. |
| 10 |
| ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत, ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणार्या मधापेक्षा गोड आहेत. |
| 11 |
| शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो; ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. |
| 12 |
| स्वत:च्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. |
| 13 |
| तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर; त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन. आणि महापातकापासून अलिप्त राहीन. |
| 14 |
| हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/019.mp3
150
19