पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? |
| 2 |
| परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की, |
| 3 |
| “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणांवरील त्यांचे पाश फेकून देऊ.” |
| 4 |
| स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे; प्रभू त्यांचा उपहास करीत आहे. |
| 5 |
| पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांना घाबरे करील. |
| 6 |
| तो म्हणेल, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.” |
| 7 |
| मी परमेश्वराचा निर्णय कळवतो; तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे; |
| 8 |
| माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन; |
| 9 |
| लोहदंडाने तू त्यांना फोडून काढशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील.” |
| 10 |
| राजांनो, आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या. |
| 11 |
| भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा.1 |
| 12 |
| पुत्राने2 रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/002.mp3
150
2