पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको; याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो. |
| 2 |
| त्यांच्या पवित्रस्थानातून ते तुला मदत पाठवो आणि ते तुला सीयोनातून साहाय्य पाठवो. |
| 3 |
| तू दिलेल्या सर्व अर्पणांचे त्यांना स्मरण होवो आणि तुझी होमार्पणे ते स्वीकारोत. |
| 4 |
| तुझ्या हृदयातील मनोरथ ते पूर्ण करो आणि तुझ्या सर्व योजना ते सिद्धीस नेवोत. |
| 5 |
| तुझ्या विजयात आम्ही आनंदाने गर्जना करू आणि आपल्या परमेश्वराच्या नावाने आपला झेंडा उंचावू. याहवेह तुझे सर्व मनोरथ पूर्ण करोत. |
| 6 |
| आता मला माहीत आहे: याहवेह आपल्या अभिषिक्तास विजय प्रदान करतात; पवित्र स्वर्गातून त्यांच्या तारणदात्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने त्याला उत्तर देतात. |
| 7 |
| कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात, परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ. |
| 8 |
| ती कोसळतील आणि नाश पावतील, पण आम्ही उठू आणि बळकटपणे उभे राहू. |
| 9 |
| याहवेह, राजाला विजयी करा! जेव्हा आम्ही हाक मारू, तेव्हा आमचे ऐका! |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/020.mp3
150
20