पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो; तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्लास होतो! |
| 2 |
| त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहेस, त्याच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाहीस. (सेला) |
| 3 |
| कल्याणदायी वरदाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस. तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालतोस. |
| 4 |
| त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले; तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिलेस. |
| 5 |
| तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचा मोठा गौरव होतो; तू त्याला प्रताप व महिमा ह्यांनी भूषित करतोस. |
| 6 |
| त्याने सर्वकाळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस; तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करतोस. |
| 7 |
| कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे, परात्पराच्या कृपेने तो ढळणार नाही. |
| 8 |
| तुझे सर्व वैरी तुझ्या हाती लागतील; तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील. |
| 9 |
| तू प्रकट होशील तेव्हा तू त्यांना जळजळीत भट्टीसारखे पेटवशील; परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यांना ग्राशील, अग्नी त्यांचा संहार करील. |
| 10 |
| त्यांची संतती पृथ्वीवरून व त्यांचे बीज मानवजातीतून तू नाहीसे करशील, |
| 11 |
| कारण त्यांनी तुझे अनिष्ट चिंतले; त्यांनी युक्ती योजली परंतु ती त्यांना साधायची नाही, |
| 12 |
| कारण तू त्यांना पाठ दाखवण्यास लावशील, तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्यांच्या मुखावर नेम धरशील. |
| 13 |
| हे परमेश्वरा, तू आपल्या सामर्थ्याने उन्नत हो; आम्ही गायनवादन करून तुझा पराक्रम वाखाणू. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/021.mp3
150
21