पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| याहवेह, तुमच्या सामर्थ्यांमुळे राजा केवढा हर्ष पावतो. तुम्ही दिलेल्या विजयामुळे तो अत्यंत उल्लासतो! |
| 2 |
| कारण त्याचे मनोरथ तुम्ही पूर्ण केले आहेत; त्याने मागितलेली एकही गोष्ट तुम्ही अमान्य केली नाही. |
| 3 |
| उत्कृष्ट आशीर्वादाने तुम्ही त्याचे स्वागत केले; तुम्ही त्याच्या मस्तकावर शुद्ध सोन्याचा राजमुकुट घातला. |
| 4 |
| त्याने तुमच्याजवळ जीवनाची मागणी केली— तुम्ही त्याला युगानुयुगाचे आयुष्य दिले. |
| 5 |
| तुम्ही त्याला विजय आणि बहुमान दिला; तुम्ही त्याला ऐश्वर्य व वैभव दिले. |
| 6 |
| सर्वकाळचे सुख देऊन तुम्ही त्याला संपन्न केले आणि तुमच्या समक्षतेचा आनंद तुम्ही त्याला दिला. |
| 7 |
| कारण राजाचा भरवसा याहवेहवर आहे; सर्वोच्च परमेश्वराच्या अक्षय प्रीतीमुळे तो कधीही ढळणार नाही. |
| 8 |
| तुमचा द्वेष करणारे तुमचे सर्व शत्रू तुमच्या हाती सापडतील. तुमचा उजवा हात तुमच्या विरोधकांचा ताबा घेईल. |
| 9 |
| तुम्ही युद्ध करण्यासाठी जेव्हा प्रगट व्हाल, तेव्हा तुम्ही अग्नीच्या भट्टीमध्ये भस्म केल्यागत त्यांना नष्ट कराल. आपल्या क्रोधाने याहवेह त्यांना गिळंकृत करतील, याहवेहचा अग्नी त्यांना भस्म करेल. |
| 10 |
| तुम्ही त्यांची संतती पृथ्वीवरून, त्यांचे वंशज मानवजातीतून कायमचे नाहीसे कराल. |
| 11 |
| ही माणसे जरी तुमच्याविरुद्ध कट रचतात, आणि कुटिल योजना आखतात, परंतु ते यशस्वी होणार नाहीत. |
| 12 |
| जेव्हा तुमचे धनुष्य ताणून तुम्ही सरळ त्यांच्यावर रोखाल तेव्हा पाठ दाखवून पळण्यास तुम्ही त्यांना भाग पाडाल. |
| 13 |
| याहवेह, तुम्ही आपल्या शक्तीने उंचविले जावो; आम्ही तुमच्या सामर्थ्याचे गुणगान व स्तुतिगान करू. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/021.mp3
150
21