पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही. |
| 2 |
| तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो; तो मला संथ पाण्यावर नेतो. |
| 3 |
| तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो. |
| 4 |
| मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. |
| 5 |
| तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस; तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस; माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. |
| 6 |
| खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील; आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/023.mp3
150
23