पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत. |
| 2 |
| कारण त्यांनीच तिचा पाया महासागरांवर घातला, आणि त्यांनीच तिला जलप्रवाहांवर स्थिर केले. |
| 3 |
| याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल? त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील? |
| 4 |
| ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही. |
| 5 |
| त्यांना याहवेहपासून आशीर्वाद लाभेल. त्यांचा तारणकर्ता परमेश्वर त्यांना नीतिमान ठरवेल. |
| 6 |
| हीच अशी पिढी आहे जी याहवेहचा शोध घेत आहे, याकोबाच्या परमेश्वरा, जे तुमच्या दर्शनासाठी आतुर आहेत. |
| 7 |
| अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा; प्राचीन द्वारांनो, उच्च व्हा; गौरवाच्या राजाला आत प्रवेश करू द्या. |
| 8 |
| असा गौरवशाली राजा कोण आहेत? याहवेह जे समर्थ व प्रबळ आहेत, जे युद्धात पराक्रमी आहेत. |
| 9 |
| अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा; प्राचीन द्वारांनो, सताड उघडा; महातेजस्वी महाराज आत येतील. |
| 10 |
| हा गौरवशाली राजा कोण आहेत? सर्वशक्तिमान याहवेह— तेच आहेत गौरवशाली राजा. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/024.mp3
150
24