|
| 1 |
|
| दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो. |
|
| 2 |
|
| हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे; माझी फजिती होऊ देऊ नकोस; माझ्या वैर्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस; |
|
| 3 |
|
| तुझी कास धरणारा कोणीच फजीत होत नाही! निष्कारण कपट करणारे फजीत होतात. |
|
| 4 |
|
| हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव; तुझ्या वाटा मला प्रकट कर. |
|
| 5 |
|
| तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो. |
|
| 6 |
|
| हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य आठव; ती पुरातन काळापासून आहेत. |
|
| 7 |
|
| हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नकोस; तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. |
|
| 8 |
|
| परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यांना सन्मार्ग दाखवतो. |
|
| 9 |
|
| तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो. |
|
| 10 |
|
| परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणार्यांना त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहेत. |
|
| 11 |
|
| हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे. |
|
| 12 |
|
| परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. |
|
| 13 |
|
| त्याचा जीव सुखासमाधानाने राहील; त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील. |
|
| 14 |
|
| परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणार्यांबरोबर असते; तो आपला करार त्यांना कळवील. |
|
| 15 |
|
| माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवील. |
|
| 16 |
|
| माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो; कारण मी निराश्रित व दीन आहे. |
|
| 17 |
|
| माझ्या मनावरचे दडपण काढ; माझ्या संकटातून मला सोडव. |
|
| 18 |
|
| माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पाहा; माझ्या सर्व पापांची क्षमा कर. |
|
| 19 |
|
| माझे वैरी पाहा, ते फार झाले आहेत; ते अत्यंत कठोरपणे माझा द्वेष करतात. |
|
| 20 |
|
| माझ्या जिवाचे रक्षण कर; मला मुक्त कर; मी तुझा आश्रय धरला आहे म्हणून माझी फजिती होऊ देऊ नकोस. |
|
| 21 |
|
| सात्त्विकपण व सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे. |
|
| 22 |
|
| हे देवा, इस्राएलास त्याच्या सर्व संकटांतून सोडव. |
|
|
|
|