|
| 1 |
|
| याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमच्यावर भरवसा ठेवतो. |
|
| 2 |
|
| माझ्या परमेश्वरा मी तुमच्यावर भरवसा ठेवतो. मला लज्जित होऊ देऊ नका, माझ्या शत्रूंना मजवर विजयी होऊ देऊ नका. |
|
| 3 |
|
| जो कोणी तुमच्यावर आशा धरतो, तो कधीही लज्जित होणार नाही. पण जे विनाकारण उपद्रव देतात, ते सर्वजण लज्जित होतील. |
|
| 4 |
|
| याहवेह, मला तुमचे मार्ग दाखवा, तुमचे मार्ग मला शिकवा. |
|
| 5 |
|
| मला तुमच्या सत्यामध्ये चालवा आणि शिक्षण द्या; कारण मला तारणारे परमेश्वर तुम्हीच आहात, आणि दिवसभर माझी आशा तुम्हामध्ये आहे. |
|
| 6 |
|
| याहवेह, तुम्ही आपली महान कृपा व प्रीती स्मरण करा, ती सनातन काळापासून आहेत. |
|
| 7 |
|
| माझी तारुण्यातील पातके आणि बंडखोर वृत्ती आठवू नका; तुमच्या प्रीतीनुसार माझे स्मरण करा, कारण याहवेह, तुम्ही चांगले आहात. |
|
| 8 |
|
| याहवेह चांगले आणि न्यायी आहेत; म्हणून ते पापी जनांस आपल्या मार्गांचे शिक्षण देतात. |
|
| 9 |
|
| ते नम्रजनांस नीतिमत्वाच्या मार्गावर नेतात, आणि त्यांना आपल्या मार्गाचे शिक्षण देतात. |
|
| 10 |
|
| जे याहवेहचे करार आणि नियमशास्त्र पाळतात, त्यांच्यासाठी त्यांचे सर्व मार्ग प्रीतीचे आणि विश्वासयोग्य आहेत. |
|
| 11 |
|
| याहवेह, आपल्या नावाच्या गौरवासाठी माझे अपराध क्षमा करा, कारण ते घोर आहेत. |
|
| 12 |
|
| याहवेहला भिऊन वागणारा मनुष्य कोण आहे? याहवेह, त्याने ज्या मार्गाने जावे, त्या मार्गाचे शिक्षण त्याला देतील. |
|
| 13 |
|
| ते समृद्धीत आपले दिवस व्यतीत करतील आणि त्यांची संतती पृथ्वीचे वतन पावतील. |
|
| 14 |
|
| याहवेहचे भय धरणार्यांवर ते आपली रहस्ये प्रगट करतात; त्यांनाच ते आपला करार जाहीर करतात. |
|
| 15 |
|
| माझे नेत्र याहवेहकडे लागलेले आहेत, कारण तेच माझे पाय जाळ्यातून सोडवतील. |
|
| 16 |
|
| याहवेह, माझ्याकडे वळून मजवर दया करा, कारण मी एकटा आणि पीडित आहे. |
|
| 17 |
|
| माझ्या अंतःकरणातील यातना दूर करा आणि माझ्या तीव्र मनोवेदनेतून मला मुक्त करा. |
|
| 18 |
|
| माझे क्लेश आणि माझ्या वेदना पाहा आणि माझ्या सर्व पातकांची क्षमा करा. |
|
| 19 |
|
| पाहा, मला अनेक शत्रू आहेत आणि किती तीव्रपणे ते माझा द्वेष करतात. |
|
| 20 |
|
| माझ्या जिवाचे रक्षण करा आणि मला वाचवा; मला लज्जित होऊ देऊ नका, कारण मी तुमच्या आश्रयास आलो आहे. |
|
| 21 |
|
| सात्विकपणा व सरळपणा माझे रक्षण करो, कारण याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे. |
|
| 22 |
|
| परमेश्वरा, इस्राएली राष्ट्राची, त्यांच्या सर्व त्रासातून मुक्तता करा! |
|
|
|
|